HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात…!, अनिल परबांच्या ED कारवाईनंतर राऊतांची खंत

मुंबई | ‘राज्यातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी मिळाले नव्हते,’ अशी खंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ईडीने केलेल्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. राऊत पुढे म्हणाले, “अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. राज्याचे कॅबिनेत मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत, असा आरोपही  राऊतांनी केंद्र सरकारवर केला आहे. ईडीने अनिल परब यांच्या वांद्रे येथील खासगी निवासस्थानी ईडीने छापा मारला आहे. अनिल परब यांना ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अनिल परब यांच्या घरी आज (२५ मे) सकाळी ईडीच्या पथाने छापा टाकला. ईडीने अनिल परब यांच्या वांद्रे येथील खासगी आणि मरिन ड्राईव्ह शासकीय निवासस्थानी ‘अजिंक्यतारा’ येथे छापे मारले आहे. तसेच मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडी छापे टाकल्याची माहिती एएनआयने दिली आहे. 

राऊत म्हणाले, “अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. राज्याचे कॅबिनेत मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकार्यांवर ईडीकडून लावले जात आहेत.  त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. तुम्ही सुडाच्या आणि बदल्याच्या भावनने किती ही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील. सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायामुळे भाजप हा रोज खड्यात जातोय. राज्यातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी  मिळाले नव्हते. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे. म्हणून आपल्या राज्यातील राजकीय विरोधकांना अशा प्रकारने नामोहरम करावे. असे काही कोणाला वाटत असेल. तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकासआघाडीचे मनोबल अजिबात खचीकरण होणार नाही. किंबहुना अशा प्रत्येक कारवायामुळे आमचे मनोबल वाढत जाईल.”

कारवाईमुळे महाविकासआघाडीचे मनोबलावर परिणाम होणार नाही

अनिल परबांविरोधात ईडीकडे सबळ पुरावे आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, “आमच्याकडे सुद्धा भाजपच्या लोकांविरोधात सबळ पुरावे आहेत. कारवाया झालेल्या आहेत. जितू नवलानीला कोणी पळवले. यांचे पुरावे सुद्धा सबळ पुरावे आहेत, असे म्हणणाऱ्यांनी द्यावे. महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम बंगाल मधील ईडीच्या ज्या कारवाया सुरू आहेत. त्या फक्त सुडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहे. फक्त शिवसेनेला त्रास द्याचे आणि बदनाम करायचे, महाविकासआघाडी सरकारला अडचणीत आणून त्यांची कोडी करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया केंद्रीय तपास यंत्रणाचा सरळ सरळ गैरवापर केला जातोय. आमच्यावर आणि आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही.” 

आयएनएस विक्रांत घोटाळा सर्वात मोठा घोटाळ

“मी सातत्याने तक्रार देत असून त्यावर साधं उत्तर येत नाहीये आयएनएस विक्रांत घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळ आसल्याचे मी मानतो. त्यांना दिलासा मिळतो,” असे म्हणत राऊतांनी नाव न घेता भाजपेचे नेते किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे. राऊत पुढे म्हणाले, “शौचालय घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल, माझ्यावर मानहानीचा दावा केला म्हणून मी मागे हाटत नाही. इतर काही प्रकरणता आम्ही हात घातले आहे. आम्ही ईडीकडे काही फाईल पाठविले आहे. ती फाईल उघडण्याची तसधी सुद्धा कोणी करत नाही. पण एक लक्ष्यात घ्या. आम्ही सुद्धा पाहून घेऊ.”  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड असल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीये, रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

News Desk

‘प्रवीण कलमे हे आव्हाडांचे सचिन वाझे’, किरीट सोमय्यांचा घणाघात..!

News Desk

औरंगाबादहून रस्त्याला यायचं म्हटलं तर प्रथम अंग चेपायची किंवा डॉक्टरची व्यवस्था करावी लागते !

swarit