HW News Marathi
महाराष्ट्र

‘पुजा चव्हाण’ची आत्महत्या की घातपात ?, एका मंत्र्याचा संबंध असल्याच्या रंगल्या चर्चा

पुणे | राज्यात अनेक मनाला हेलावून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. ४ दिवसांपूर्वी पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केली. पुजा चव्हाणअसं तरुणीचं नाव असून ती इंग्लिश स्पिकींगच्या क्लासेससाठी भावासोबत राहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आणि यावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रितसर तक्रार दाखल केली आहे.

तर, मुळची परळीची असलेली २२ वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात राहात होती. रविवारी मध्यरात्री तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं म्हटलं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा कोणताही मेसेज असं काहीही सापडलं नाही. पोलीसांनीही त्याबाबती तशी काही माहिती दिलेली नाही. दरम्यान, याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे

दरम्यान, एका मंत्र्याचं यात नाव यायला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून तक्रार करण्याची मागणी होऊ लागली आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसं निवेदनही देण्यात आलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारं निवेदन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिलं आहे.

ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पुजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सुचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होती आहे.ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या मंत्र्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाल्या आहेत.

यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे. कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याविषयी देखील उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडचणीत येऊ, असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले, असे म्हटले जाते. पूजा चव्हाणच्या फेसबुक प्रोफाइलवर एका मंत्र्याचा फोटो होता. त्या अनुषंगानेही चर्चा होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे घराणं पुन्हा आमने सामने, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल

News Desk

‘तर मास्तराच्या मुलाने हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली त्यांची चौकशी का होत नाही’-एकनाथ खडसे

News Desk

‘करुणा शर्मा यांच्या निवासस्थानी बीड पोलीस दाखल’, तर सर्च ऑपरेशन सुरू!

News Desk