HW News Marathi
महाराष्ट्र

रेल्वेचे आरक्षणासाठी पोस्टपेड पर्याय

मुंबई- रेल्वे प्रवाशांना अवघ्या तीन सेकंदाच तिकीट आरक्षित करण्याची सोय रेल्वे विभागाने उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्ही बुकींग झाल्यानंतर रक्कम अदा करू शकता.‘डिजिटल पेमेंट’ला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेनं हे पाऊल उचलले आहे. ‘बुक नाऊ पे लेटर’ असे या योजनेचे नाव आहे.

क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग आदी पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यापूर्वी रेल्वेचं तिकीट आरक्षित करताना पॅन किंवा आधार कार्ड क्रमांकासह सर्व माहिती भरावी लागत होती. त्यासाठी वारंवार साईन-अप करावं लागत होतं. पण रेल्वेनं सुरु केलेल्या या नवीन सुविधेमुळं तिकीट आरक्षित करण्यासाठी आता वारंवार साईन-अप करण्याची गरज भासणार नाही,असं रेल्वे राज्य मंत्र्यांनी सांगितलं. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर या सुविधेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर नियम आणि अटींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तिकीट आरक्षित केल्यानंतर प्रवाशांना १४ दिवसांच्या आत त्याचे पैसे ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

News Desk

दलित महिला बलात्कार प्रकरणी नुसत्याच भेटी

News Desk

‘फडणवीसांना शह देण्यासाठी केंद्राने नारायण राणे यांचा बुजगावणं म्हणून वापर’- विनायक राऊत

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट, आतापर्यंत ८० हून अधिक जण जखमी

News Desk

सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणाची १० जानेवारीला सुनावणी

News Desk

हिमाचल प्रदेशमध्ये कडा कोसळली! 30 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले

News Desk