HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार? प्रकाश आंबेडकरांचा सवाल 

मुंबई | थकित वीज बिलांच्या प्रश्नांवरुन विरोधी पक्ष आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर पुन्टीहा एकदा टीका केली आहे. मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार? हे एकदा स्पष्ट करा असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तसंच वाढीव वीज बिलांच्या माफीवरुन सरकारने घूमजाव केलं आहे. ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरु नये असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वीज जोडण्या तोडल्या गेल्या तर वंचित बहुजन आघाडी त्या जोडण्या पुन्हा जोडून देईल.

“अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्याचा खुलासा केला तर अधिक चांगलं होईल. अन्यथा वीजबिल भरु नका. वीजबिल विरोधात आम्ही आंदोलन सुरु केलं आहे, ते आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र करु, असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

महावितरणनेच हे सांगितलं आहे की लॉकडाउनच्या काळात मीटर रिडिंगसाठी कंत्राट दिलं होतं. त्यांना बंदी घालण्यात आली नव्हती तर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मीटर रिडिंगच्याबाबतीत आमच्याकडून चूक झाली आहे. ५० टक्के वीज बिल माफीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला आहे असंही महावितरणने सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मार्च २०२० ला ५१ हजर ९४६ कोटी इतकी थकबाकी होती. मात्र २०१४ ला ही थकबाकी निम्म्याहून कमी होती असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच वीज बिल माफीवरुन या सरकारने ग्राहकांची फसवणूक केली आहे. कारण एप्रिलपासून जी बिलं आली आहेत त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कुणाच्या सांगण्यावरुन केली? कशी केली ते सरकारने स्पष्ट करावं अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार येणार या आनंदात राहू नका, नाही आले तर दु:खही करू नका !

News Desk

बार्शीकर पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना जागा दाखविणार !

News Desk

“शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रीपद?”, फडणवीस म्हणाले…

News Desk