HW News Marathi
महाराष्ट्र

प्रसाद लाड यांचे पोलिसांविरुद्ध उपोषण

मुंबई | काल (१६ जानेवारी) सकाळी सायन पोलीस स्टेशनबाहेर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी उपोषण केले होते. प्रसाद लाड यांना सरकारने मान्यता दिलेल्या एका जमीनीवर आमदार निधीतून बहुउद्देशीय केंद्र सुरु करणार होते ज्याचे उद्घाटन काल दि. १६ जानेवारी २०२० ला होणार होते, पण मुस्ताकिम शेख या माणसाने या जागेवर घुसखोरी केली त्याची तक्रार सायन पोलीस ठाण्यात ३ महिन्यांपूर्वी केली होती पण त्यावर पोलीसांनी काही कारवाई न केल्याने प्रसाद लाड यांनी सायन पोलिस स्टेशनबाहेर उपोषण केले होते.

जमीन हडपण्याच्या काही तक्रारी प्रसाद लाड यांच्या कानांवर येत होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करत होते पण जेव्हा ती गोष्ट माझ्याबाबतीत घडली तेव्हा मी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहीले होते पण या कुख्यात माफीयाला पोलीसांनी आमच्या पत्रांवरुन अटक तर केली पण त्याला लगेच सोडूनही दिले आणि पुन्हा शेख याने बंदुकीचा धाक दाखवत पुन्हा आमच्या जमीनीवर वेगळ्या समाजातील महिलांना आणत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, या आधी तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही या बाबतीत तक्रार करायला गेलो असता आमच्यावर वरिष्ठ मंत्र्यांनी दबाव टाकला त्यामुळे आमची तक्रार नोंदवून घेऊ शकणार नसल्याची कारणे पोलीसांनी आम्हाला दिली असंही प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. आणि जोपर्यंत पोलीस आयुक्त आम्हाला आमच्या जमीनीविषयी ठोस उत्तर देत नाहीत आणि त्या माफीया मुस्ताकिम शेखवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूव ठेवू असंही लाड यांनी सांगितले. सामान्य माणसाला त्रास होत असेल तर एक लोकप्रतिनीधी म्हणून त्याबाबतीत पोलीसांकडे धाव घेणे आणि मदत मागणे हा आमचा हक्क आहे असं सांगत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर

News Desk

“परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय”

News Desk

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

News Desk