HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही राणे साहेबांचा खून करणार आहेत”, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

रत्नागिरी | केंद्रीय मंत्री नारायण यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतरचे पडसाद आता दिसू लागले आहेत. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली आहे.

तुम्ही साहेबांचा खून करणार आहात

भाजपचे विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि भाजप नेते निलेश राणे यांच्या सोबत पोलिस स्टेशन मध्ये आंदोलन केलं आहे. “साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात तुम्ही, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप, नितेश-निलेश राणेंसह पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन, अटक वॉरंट आणि नोंदी दाखवण्याची मागणी, जोपर्यंत नोंदी दाखवणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही, साहेबांच्या जीवाला धोका आहे, साहेबाला तुम्ही रस्त्यात मारणार आहात, खून करणार आहात”, प्रसाद लाड यांनी गंभीर आरोप केला आहे.

प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती

नारायण राणे यांना अटक करण्यात अली आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थायमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना अटक झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे.

सॅच्युरेशन नॉरमल आहे, बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

पण राणेसाहेबांना जेवण करु द्या

तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असं आम्ही पोलिसांना सांगितलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होतं, त्यांना ECG करायचा होता, त्यांना काहीही करु दिलं नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचलं, पोलिसांनी अजूनही अटक दाखवलेली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य! – उद्धव ठाकरे

Aprna

परमवीर सिंग यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करा !

News Desk

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर

News Desk