HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप – प्रशांत भूषण 

मुंबई | वकील प्रशांत भूषण यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे एक कथित whatsApp चॅट वायरल झाले आहेत. प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कथित WhatsApp चॅट शेअर केले आहे. त्याच्या मते, हे चॅट अर्णब गोस्वामी आणि रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ यांच्यामधील झालेली बातचीत आहे.

प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलचे स्क्रीनशॉट शेअर करत असे लिहिले आहे की, हे बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या चॅटचे पसरलेले फोटो आहेत. या फोटोंवरून गोस्वामी यांच्या काटकारस्थानाचा पोल खोल होते. प्रशांत भूषण यांनी पुढे असे लिहिले आहे की, याबरोबर असंही उघड होतं , कशाप्रकारे मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर केला गेला आहे. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे सीईओ यांच्यातील WhatsApp चॅट लीक झालेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ट्विटर युजर्स अर्णब गोस्वामी हॅशटॅगसह कथित चॅट शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. प्रशांत भूषण यांच्या याच ट्वीटवर कमेंट करताना पत्रकार मीना दास नारायण यांनी लिहिले आहे की, आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू ? एक कारण सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटवर परवेज खान या युजरने या ब्रेकींग न्यूजला कोणतंही मीडिया हाऊस का कव्हर करत नाहीय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलाखत सुरू असताना केंद्रीय मंत्र्यांच्या डोक्यात घुसली काच

News Desk

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna

‘म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते…

News Desk