HW News Marathi
महाराष्ट्र

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई करू नये, सरनाईकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती. त्यानंतर भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय. म्हणून भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलं होतं, असं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यातच आता पुन्हा प्रताप सरनाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकलेली दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

किरीट सोमय्यांचा आरोप

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई करू नये, यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक करू नये, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा पूर्वेश, विहंग तसेच मेहुणा योगेश चांदेगला यांनीही याचिका दाखल केली आहे. तर प्रताप सरनाईक यांच्या विहंग व आस्था ग्रुपने विकासक योगेश देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केला होता.

यानंतर सक्तवसुली संचालनालयाने प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा पूर्वेश, विहंग तसेच मेहुणा योगेश चांदेग यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली होती. ईडीच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईकांच्या मानेवर ईडीकडून अटक होण्याची टांगती तलवार होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले होते. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असंही आदेशात नमूद करण्यात आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी” वरुण सरदेसाईंचा ‘मावसभावाच्या काकां’नाच टोला

News Desk

महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपचाच आडमुठेपणा-सचिन सावंत

News Desk

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”, शालिनी ठाकरेंचा सवाल

Jui Jadhav