HW News Marathi
महाराष्ट्र

“माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरचे आरोप”, प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

मुंबई | राज्याचे यंदाचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत आहे. यंदाचं अधिवेशन २ दिवसांचं असल्यामुळे महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये वादावादी सुरु होती. काल (५ जुलै) पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे. आज (६ जुलै) अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी विधानसभेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्यावर झालेले आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरील आरोप आहेत असं सरनाईकांनी म्हटलं आहे.

माझ्यावर विनाकारण आरोप म्हणजे ठाकरे सरकारची बदनामी !

आमदार प्रताप सरनाईकांच्या मते, माझ्यावर आरोप करून विनाकारण सरकारची बदनामी केली जाते. जर मी गुन्हा केला असेल तर शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु गुन्हाच केला नसेल तर मला या आरोपातून क्लीनचीट देण्यात यावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. MMRDA विभाग राज्य सरकारच्या अंतर्गत येतो. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने माझ्यावर आरोप करण्यात आले. याबाबत मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र दिलं आहे असं त्यांनी सांगितले.

माझ्याविरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो !

प्रताप सरनाईक यावेळी असेही म्हणाले की, माझ्याविरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश

News Desk

अपयश लपण्यासाठी हा छाती बडवण्याचा प्रकार आहे…

News Desk

पंकजा मुंडेंनी घेतली संभाजीराजेंची सदिच्छा भेट

Ruchita Chowdhary