HW News Marathi
महाराष्ट्र

“पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात”, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य

मुंबई | ठाण्यात आज(३१ ऑगस्ट) प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत.

मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात

प्रताप सरनाईकांवर सध्या ईडीची कारवाई सुरु आहे. तसेच शिवसेनेचे आणखी नेतेही ईडीच्या रडारवर आहेत. “मुख्यमंत्री साहेब तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आजपासून या प्लँटचे लोकार्पण झाल्यामुळे कार्यरत होत आहे. या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. खासकरून संजय राऊत साहेब यांचे मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात. आता दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत.”, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

जेवढी संकट येत आहे तेवढ्या संकटाशी शिवसेना सामना करत

“आपल्यावर जेवढी संकट येत आहे तेवढ्या संकटाशी शिवसेना सामना करत आहे. त्याला कारण आपल्या मागे असलेली सामाजिक कार्याची पुण्याई. हे पुण्य आपल्या गाठिशी आहे. तुमच्यावर कितीही संकटं आली. आमच्यावर संकटं आली. तरी चांगल्या कामाचं गाठोडं आपल्या सोबत आहे. लोकांची आपण सेवा करतो. लोकं आपल्या पाठिशी आहेत.”, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण?

सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) नोव्हेंबर २०२०मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार्‍यावरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

मुंबईत भाजप सेनेच्या पाठिशी : मुख्यमंत्री

News Desk

गावात गटतट असावेत असा त्यांचा हेतू असावा, रोहित पवारांचे राम शिंदेंना प्रत्युत्तर

News Desk