HW News Marathi
महाराष्ट्र

प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक आज ईडीसमोर हजर होणार

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर आता ते ईडी कार्यालयासमोर हजर होणार आहेत. प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक आज (१० डिसेंबर) ईडीसमोर हजर होणार आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक आज सकाळी ११ वाजता सक्तवसुली संचालनालय (ED) समोर हजर होणार आहे. याआधी या दोघांनी ईडीने अनेकदा समन्स बजावला आहे. मात्र यानंतरही ते दोघेही ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

मात्र नुकतंच प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. या आदेशानंतर आता प्रताप सरनाईक आणि विहंग ईडीसमोर हजर होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्ज आज होणार सुनावणी

Aprna

नक्षली हल्ल्यातील शहीद जवानांना मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची श्रद्धांजली

News Desk

महाराष्ट्रात २४ तासांत ६० कोरोना पॉझिटिव्ह, राज्याचा आकडा १०७८ वर

News Desk