HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांनी भाजपच्या प्रवीण दरेकरांची भेट का घेतली?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज (१९ मार्च) भेट घेतली. त्यांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आले. अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. दरम्यान, प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांनी त्यांची भेट का घेतली याचे कारण सांगितले आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवारांनी तुमची भेट कोणत्या कारणासाठी घेतली असा प्रश्न विचारला असता ही सदिच्छा भेट होती असे त्यांनी सांगितले आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, “बरेच दिवस रोहित पवार म्हणत होते की भेटूयात त्यामुळे ही सदिच्छा भेट होती. राजकारणातील तरुण आमदार, समवयस्क असल्याने भेट घेतली”. यावेळी प्रविण दरेकर यांनी आम्ही समविचारी आहोत असं म्हटल्यानतंर एकच हशा पिकला होता. त्यानंतर त्यांनी समविचारी म्हणजे सहकार क्षेत्रातील आहेत, मी ही बॅंकींग क्षेत्रात काम करतो, त्यांचेही साखर कारखाने आहेत त्यामुळे राजकीय भेट नव्हती असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

पुढे त्यांनी असंही म्हटलं की, “पत्रकारांना, मिडियाला ब्रेकिंग बातमी मिळेल अशी भेट नव्हती”. महाराष्ट्रातील स्थिती पाहता पुढे काय करायला हवं या बाबतीत ही भेट असल्याचं दरेकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ज्या चर्चा सुरु झाल्या होत्या भेटीबद्दल त्याला दरेकरांनी पुर्णविराम दिला आहे.दरम्यान, राज्यातील एकूण स्थिती पाहता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सध्या महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण असो किंवा पूजा चव्हाणची आत्महत्या असो या सगळ्या प्रकरणावरुन भाजप सध्या सरकारला टार्गेट करत टोला लगावत आहे. त्यामुळे असं असताना रोहित पवार यांनी प्रविण दरेकरांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन

Aprna

ED अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी! – गृहमंत्री

Aprna

वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना “मनसे” इशारा, तुमच्या देशात निघून जा !

swarit