HW News Marathi
Covid-19

आजपासून मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई शहरात कोरोना रुग्णांची सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. ५ मे रोजी काढलेल्या आदेशात सुधारणा करत जीवनावश्यक वस्तू व औषध दुकानांसोबत इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने उघडण्याची आजपासून (७ मे) परवानगी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी दिली आहे. यामध्ये आता एकल दुकाने उघडता येतील व एका लेनवर प्रत्येकी एकच दुकान उघडण्यास परवानगी असेल. सहाय्यक आयुक्तांनी याची काटेकोरपणे पालन करायचे आहे, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

३ मे रोजी राज्यातील रेड झोनमधील कंटेनमेंट इतर जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करून काही अटींसह दुकाने आणि वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मद्यविक्रीच्या दुकाना बाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी होती. यावेळी दुकाना बाहेर सोशल डिस्टन्सिंगचे नियम तिनतेरा वाजल्याचे दिसून आले. त्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त परदेशी यांनी तातडीने पुन्हा लॉकडाऊनच्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. प्रवीण परदेशी यांनी ५ मे रोजी परिपत्रक काढून मद्य आणि अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील उद्याने बंद करा अशी महापौरांची आयुक्तांकडे पत्रातून मागणी

News Desk

महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवण्याच्या गृहमंत्र्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद

News Desk

आजपासून राज्यभर रात्री ८ नंतर जमावबंदी, राज्याकडून गाईडलाईन जारी

News Desk