HW News Marathi
महाराष्ट्र

“लोकलने लोकं प्रवास करतात, वरळीत पब सुरु असतो मग परीक्षा पण झाल्याच असत्या”, भाजपचा टोला

मुंबई | गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. १४ मार्चला होणारी ही परिक्षा रद्द करण्यात आली आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनीही ट्विट करत निषेध केला आहे. ‘विद्यार्थ्यांचा उद्रेक साहजिक आहे, MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आघाडी सरकार खेळत आहे. समन्वय राखून ह्या परीक्षा घेण्याची गरज होती’, असं दरेकरांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, ‘लोकलमध्ये लाखो लोक दाटीवाटीने प्रवास करतायत, अधिवेशनही झालं, काँग्रेसच्या आंदोलनात लाखो लोकं होते, वरळीत पब सुरू, मग परीक्षाही घेता आल्या असत्या’, असा टोमणाही यावेळी त्यांनी लगावला आहे. त्यामुळे उद्दव ठाकरे यावर काय निर्णय घेणार आणि परिक्षेबाबत काय निरणय देतात हे राहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर घाटकोपरमध्ये मनसेकडून स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात

Aprna

देवभुमीतून आलेल्या राज्यपालांकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र मिळत असेल तर ती काळाची गरज आहे! 

News Desk

सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल कंगना राणावतचे आदित्य ठाकरेंसाठी काही प्रश्न

News Desk