HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषद घेणार – विजय वडेट्टीवार

मुंबई | कोरोना संसर्ग लक्षात घेऊन ४मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभर विरोध झाल्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षेवर आजच निर्णय होणार आहे. या परीक्षा नेमकी कधी होणार याविषयी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. तशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही ९ मराठी’वर बोलताना दिली आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी एमपीएससी परीक्षेच्या तारखेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच निर्णय घेणार आहेत. तसेच ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दल माध्यमांना माहिती देतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“एमपीएससीच्या परीक्षा जास्त काळासाठी पुढे ढकलणार नाहीत. या परीक्षा वेळेवर व्हाव्यात अशी अनेकांची भूमिका आहे. गोंधळ घालून सरकारला कोंडीत पाडण्याचं काम सुरु आहे. एमपीएससी परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याबाबत सांगतील. हा निर्णय ते कदाचित आजच घेतील,” असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुलची सभा संपताच मंडप कोसळला

News Desk

NCBच्या कर्मचाऱ्यांवर ड्रग्स पेडलर्सचा हल्ला, NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे जखमी

News Desk

लोकल पाससाठी मुंबई महापालिका दोन दिवसात App तयार करणार असल्याची किशोरी पेडणेकरांची माहिती!

News Desk