HW News Marathi
महाराष्ट्र

‘प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबाड आणि गाल रंगवू’!

मुंबई। भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपाचे भाषेचा वापर वाद निर्माण झाला.’गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं. यावरच आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे. ‘दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा’ असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट करत प्रवीण दरेकर यांना इशारा दिलेला आहे.

मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादी हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकेवाल्यांचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीतील नेतृत्वाकडे बघा…या पक्षात कुठल्या गरीब माणसाला आमदार, खासदार होता आलं नाही. भाजपच्या आमदारांची आणि खासदारांची यादी बघा..आमच्या पक्षात संघर्ष करणाऱ्यांना स्थान आहे,’ असं ते म्हणाले.

प्रविण दरेकर यांनी माफी मागावी

महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रविण दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. दरम्यान, या सगळ्या वादाविषयी प्रविण दरेकर यांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष

शिरुर मधील लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलत असताना दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी केली. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाहीय. सुभेदार,कारखानदार,बँका,आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा आरोप केला आहे.

भाजपच्या एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ

रामोशी समाजाच्या निमित्ताने आता भाजपच्या एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ असेल आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात उगारली जाईल. राज्यात जिथे जिथे महिला अत्याचार होईल तिथे तिथे हातात कु-हाड घेणार अस दरेकर यांनी सरकारला टोमणा मारला आहे.

सर्व गोष्टीला हे नालायक सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार

राज्यात महिलांवर अत्याचार,बलात्कार,विनयभंग होतात अन पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार,बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला हे नालायक सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असल्याचं दरेकर म्हणाले. राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर सरकारचा अंकुश नाही. अत्याचाराच्या घटना थांबवणं हा सरकारचा प्राधान्यक्रम दिसत नाही यांना फक्त सत्ता टिकवायची आहे असं दरेकर म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्याला अटक; आजची रात्र जेलमध्येच

Aprna

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने ४०० कोटी रुपये  केले मंजूर

News Desk

फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्यावा! – रामदास आठवले

Aprna