HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे आमदार बहुदा राष्ट्रवादीमूळे निवडून आले, शरद पवारांच्या उत्तराला दरेकरांचे प्रत्युत्तर

मुंबई | शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत आज घेतली. ही मुलाखत ३ दिवस प्रदर्शित केली जाणार आहे. दरम्यान, या मुलाखतीत शरद पवार यांना फडणवीस यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय प्रक्रियेत कुठेच नव्हते या शरद पवारांच्या उत्तरावर प्रवीण दरेकर असे म्हणाले की, राष्ट्रवादी नावाचा पक्ष महाराष्ट्र वगळता दुसऱ्या कोणत्याही राज्यात दिसत नाही. तसेच, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला होता. यावर दरेकर म्हणाले, पण कोरोना आणि या दुष्काळाच्या प्रसंगी घरात न बसता आणि सत्तेत नसताना पुन्हा पुन्हा लोकांपर्यंत पोहोचल्याने देवेंद्र फडणवीस कौतुकाचा विषय बनले आहेत.

महाआघाडीत कोणाचा रिमोट कंट्रोल नाही, यावर ते म्हणाले की, म्हणूनच कोणाला कोणाचा पायपुस लागत नाही. ज्याला जे वाटेल तो ते करतो, आज हा दिसतो उद्या तो दिसतो. आणि म्हणूनच कोरोना पसरतो. सकाळी आरोग्यमंत्री सांगतात की कुठल्याही परिस्थतीत लॉकडाऊन होणार नाही आणि त्याच संध्याकाळी ठाणे, पुणे यांसह प्रमुख शहरात लॉकडाऊन जारी केला जातो.

भाजपचे १०५ आमदार शिवसेनेमुळे निवडून आले. यावर ते म्हणाले की, शिवसेनेचे बहुदा राष्ट्रवादीमुळे निवडून आले, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या”, तरुणाची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या आठवलेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी,राष्ट्रवादीच्या मागणी!

News Desk

महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली – राम कदम 

News Desk