HW News Marathi
Covid-19

मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई | मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा आज (११ जुलै) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशोक खैरनार हे वांद्रे पूर्व येथील एच पूर्व विभागाचे ते वॉर्ड ऑफिसर होते. ५७ वर्षांचे अशोक खैरनार यांना आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर सुरूवातील गुरूनानक हॉस्पिटल, नंतर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल (११ जुलै त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवले गेले होते, पण आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

शिवाजी पार्क स्मशानभूमीत अशोक खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुरूवातीला रूग्णसंख्या वाढलेल्या वांद्रे पूर्व येथील एच पूर्व विभागात अशोक खैरनार यांनी आकडा कमी होण्यासाठी प्रयत्न केले. खैरनार यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत सर्वात कमी ग्रोथ रेट त्यांच्या एच इस्ट वॉर्डचा होता. रुग्णसंख्या वाढीचा दर रोखण्यात तसंच, डबलींग रेट वाढवण्यात त्यांना यश आलं होतं. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीचा परिसर एच पूर्व विभागात येतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मद्य प्रेमींसाठी खुशखबर, मद्य खरेदीसाठी ई-टोकन सुविधा सुरु !

News Desk

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघात ६८ टक्के मतदान

News Desk

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी होम क्वारंटाईन राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

News Desk