HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकीकडे ५ राज्यांचा निवडणुकीचा निकाल लागला अन् दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले

मुंबई | देशात २ मेला ५ राज्यांच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव पुन्हा एकदा कडाडले. निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. त्यामुळे मंगळवारी पेट्रोल १५पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले आहे. जवळपास ६६ दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये २७ फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात याउलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज होता.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 96.95, डिझेल 87.98

पुणे: पेट्रोल- 96.60, डिझेल 86.30

नाशिक: पेट्रोल- 97.36, डिझेल 87.04

औरंगाबाद: पेट्रोल- 98.19, डिझेल 89.22

Related posts

संघाच्या गुरुंनी आम्हाला कधीही मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवला नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : मुलासाठी संघर्ष उभा राहणे चुकीचे !

News Desk

शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका

Kiran Yadav