HW News Marathi
देश / विदेश

मोदींनी आपल्या देशाची प्राचीन परंपरा जगभरात पोहचवण्याचे काम केले !

नांदेड | आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्ताने आज (२१ जून) देशभरात योगाभ्यासाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमधील आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यासह योगासने केली आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. “पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाची प्राचीन परंपरा जगभरात पोहचवण्याचे काम केले. ५ वर्षांपूर्वी मोदींनी २१ जूनला योग दिवस म्हणून घोषित केले. हा योग्य दिवस आज संपूर्ण जगात योग दिवस साजरा होत आहे. ते केवळ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य झाले”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

“संपूर्ण जगाने आता योगाचे महत्त्व जाणले आहे. ५ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी २१ जूनला योग दिवस म्हणून घोषीत केले. योग ही आपल्या भारताची प्राचीन परंपरा आहे. पंतप्रधान मोदी यांनी ही परंपरा जगभरात पोहोचविण्याचे काम केले. संपूर्ण जगाने आपली ही प्राचीन परंपरा स्वीकारली, याचा मोठा अभिमान वाटतो. हे सर्व मोदींमुळेच शक्य झाले आहे”, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. यावेळी योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. “पंतप्रधान मोदींनी जगभरात योग पोहचवला यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. योग हा आपल्या आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारा भाग आहे”, असे रामदेव बाबा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Aprna

परदेशात जॉब करण्याआधी खात्री करा, महाराष्ट्रमधील युवकाची फसवणूक करून बेदम मारहाण

Manasi Devkar

गांधी-नेहरू कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे !

News Desk