HW News Marathi
महाराष्ट्र

‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

मुंबई | भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. पंतप्रधान हे गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी मुंबईत आले आहेत.  ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ हा पहिला पुरस्कार मिळणारे पंतप्रधान हे पहिले व्यक्ती आहेत. हा पुरस्कार सोहळा आज (२४ एप्रिल) षण्मुखानंद सभागृहात सुरू आहे. 

पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.

Related posts

‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

“मी चुकीचं काही केलं नाही”…., अनिल परब यांचं स्पष्टीकरण

News Desk

नेत्यांच्या घरी झाले बाप्पा विराजमान!

News Desk