HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवून संपूर्ण देश एक केला !

बीड | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवून संपूर्ण देश एक केला’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. शहांनी बीडच्या सावरगाव घाटच्या दसरा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले केला. शहा पुढे म्हणाले की, तुम्ही लोकसभा निवडणुकीत ३०० जागा दिल्यानंतर मोदींनी ३७० हटविले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजाला घटनात्मक दर्जा दिला. तसेच ओबीसी समाजासाठी आयोगाची स्थापना केली.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे वडिल गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवले, असे सांगत त्याचे कौतुक केले. मोदींनी केलेल कार्य हे घराघरापर्यंत पोहचवा, असे शहांनी उपस्थितींना सांगितले. औरंगाबाद विमानतळावर पंकजा मुंडे यांनी स्वगत केले. पंकजा मुंडे आणि अमित शहा हेलिकॉप्टने सभास्थळी दाखल झाले.

यावेळी शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्याच्या स्वागतासाठी पंकजा मुंडे ३७० तोफांची सलामी आणि ३७० तिरंगी झेंडे लावत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ३७० तोफांची सलामी सभेपासून दूर दिल्याचे पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषमादरम्यान सांगितले. सावरगावात जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

दसरा मेळाव्यातील महत्त्वाचे मुद्दे

  • मोदींनी ओवीसीसाठी आयोगाची स्थापना केली – शहा
  • मोदींनी ओबीसी समाजाला घटनात्मक दर्जा दिला – शहा
  • हे राजकीय प्रचारासाठी आलो नसून दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे – शहा
  • ७० वर्षापासून प्रलबिंत गोष्टी मोदींनी केल्या – शहा
  • पंतप्रधान मोदींचे कार्य प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवा – शहा
  • पंतप्रधान मोदींमुळे कलम ३७० हटवता आले – शहा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवून संपूर्ण देश एक केला – शहा
  • पंकजा मुडेंनी गोपनाथ मुडेंच्या पावलावर पाऊल ठवले – शहा
  • ऊस तोड कामगारांसाठी मुडेंनी आयुष्य वेचले – शहा
  • भगवान बाबाच्या मार्गाने गोपीनाथ मुडेंचे कार्य – शहा
  • तुम्ही ३०० जागा दिल्या मोदींनी कलम ३७० हटविले – शहा
  • ओवीसी, वंचित घटकांना न्याय मिळवून दिला – शहा
  • शिक्षणाचा विचार लोकांमध्ये रुजविला – शहा
  • भगवान बाबांनी लोकांसाठी आयुष्य वेचले – शहा
  • अमित शहांच्या भाषणाला सुरुवात
  • गोपीनाथ मुंडेंनी स्वत:च्या हडाची काडे केली – पंकजा मुंडे
  • शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या स्वाभिमान टिकवणार – पंकजा मुंडे
  • नेतृत्तवाची शाबासकी मिळणे मोठे भाग्य – पंकजा मुंडे
  • तुमच्या दारात सेवा यावीसाठी मी काम करणार – पंकजा मुंडे
  • माझ्या भावांना कोयता उचलायची वेळ येऊ नये – पंकजा मुंडे
  • गोपीनाथ मुंडेंनी जे काम सुरू केले, ते मी पुढे नेहणार – पंकजा मुंडे
  • भगवान बाबांनी सर्वांना शिक्षणाचा विचार दिला – पंकजा मुंडे
  • अमित शहांनी कलम ३७० हटवून लोकांना न्याय दिला – पंकजा मुंडे
  • ३७० ध्वज दाखवून अमित शहांचे स्वागत केले -पंकजा मुंडे
  • सुरक्षेच्या कारणास्तव तोफांची सलामी दूर देण्यात आली- पंकजा मुंडे
  • जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याबद्दल, ३७० तोफांची सलामी दिली. – पंकजा मुंडे
  • अमित शहांच्या उपस्थितीत सीमोउल्लंघन करायचे – पंकजा मुंडे
  • ही गर्दी भविष्याची दिशा बदलवणार – पंकजा मुंडे
  • बीड आणि नगरमधील सर्व उमेदवार मंचावर उपस्थित
  • पंकजा मुंडे आणि अमित शहा हेलिकॉप्टने सभास्थळी दाखल
  • अमित शहा औरंगाबादच्या विमानतळावर मंकजा मुंडेंनी केले स्वागत

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर! – दादाजी भुसे

Aprna

माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करु नका; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर परखड टीका

News Desk

दानवे म्हणाले- “मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो”

News Desk