HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल

शिर्डी | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवार) शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. श्री साई बाबा मंदिराच्या समाधी शताब्दी उत्सवात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे काहीच वेळापूर्वी शिर्डीत दाखल झाले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले आहे. साई समाधीचे दर्शन घेऊन त्यानंतर पंतप्रधान मोदी जनतेची संवाद साधणार आहेत.

‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत राज्यभरात बांधलेल्या घरकुलांपैकी २० हजार लाभार्थ्यांना यावेळी घरकुल वाटप केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी साई समाधी मंदिरात उपस्थित असताना इतर भाविकांनाही दर्शन घेता येणार असल्याची माहिती शिर्डी संस्थाकाकडून दिली गेली आहे.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यांनतर प्रथमच नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पंचारती झाली असून त्यांनतर पाद्यपूजन सोहळादेखील पार पडला आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी शिर्डीच्या जनतेशी संवाद साधतील.

 

Related posts

“उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता” – नवाब मलिक

News Desk

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं –  देवेंद्र फडणवीस

News Desk

‘महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही’, फडणवीसांचा गंभीर आरोप!

News Desk