नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मोदी उद्या (३ एप्रिल) सकाळी ९ वाजता व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर प्रथम मोदी देशवासियांशी संवाद साधणार असून सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. या पार्श्वभूमीवर मोदी उद्या मोठी घोषणा करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
At 9 AM tomorrow morning, I’ll share a small video message with my fellow Indians.
कल सुबह 9 बजे देशवासियों के साथ मैं एक वीडियो संदेश साझा करूंगा।
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2020
मोदींनी आज (२ एप्रिल) महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आदी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉनफरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधांनी लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यात लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन राज्यातील मुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.