HW News Marathi
देश / विदेश

Breaking News : चंदा कोचर यांचा बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा

मुंबई | आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या व्यवस्थापनाने कोचर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. चंदा कोचर यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बक्शी यांनी ३ ऑक्टोबरपासून पदभार स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देण्यावरून चंदा कोचर अडचणीत आल्या होत्या. या प्रकरणाची बँकेकडून चौकशी सुरू होईपर्यंत कोचर यांना जून महिन्यापासून अनिश्चितकालीन अशा सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. कोचर यांच्या राजीनाम्याच्या माहिती मिळताच आयसीआयसीआय बँकेच्या शेअरचे भाव वधारले आहे. बँकेच्या शेअरचा भाव ३ टक्क्यांनी वाढला असून त्यात ३१३ अंकांची सुधारणा झाली आहे.

नेमके काय आहे प्रकरण

आयसीआयसी बँकेने व्हिडिओकॉन ग्रुप २०१२मध्ये ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी हे कर्ज मंजूर केले होते. परंतु २०१६ रोजी आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉनचे गुंतवणूकदार असलेले अरविंद गुप्ता यांनी ब्लॉग लिहून असा दावा केला होता. तसेच चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हिडिओकॉन ग्रृपच्या मालकांशी व्यवसायिक संबंध आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndependenceDay2020 | पंडित नेहरूंचे लोकप्रिय भाषण “ट्रिस्ट विथ डेस्टिनी”

News Desk

पंतप्रधान मोदींचा सोशल मीडियावरून संन्यास घेण्याचा विचार

swarit

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याची राज्यपालांकडे शिफारस

News Desk