नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. देशातील लॉकडाऊला उद्या २१ दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या (१४ एप्रिल) सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भाती ट्वीट मोदींनी त्याच्या ट्वीटर हँलडवरून केली आहे.
Prime Minister @narendramodi will address the nation at 10 AM on 14th April 2020.
— PMO India (@PMOIndia) April 13, 2020
१५ एप्रिल रोजी या लॉकडाऊनची मर्यादा संपणार आहे. त्यापूर्वीच पंजाब, महाराष्ट्र, ओडिसा या राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून ३० एप्रिलपर्यंत केली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे. लाकडाऊनची घोषणा केल्यानंतर मोदींनी देशवासियांना ५ एप्रिला रात्री ९ वाजून ९ मिनिटला लाईट बंद करून दिवा लाण्यास सांगितले होते.
कोरोनाचा रुग्णांची संख्या दिवसेंदिवसव वाढत देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशभरात स्थलांतरित झालेल्या मजुरांनी गावाकडची वाट पकडल्याने लॉकडाउनचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. लॉकडाऊमध्ये रस्ते वाहतूक बंद असल्यामुळे सर्व मजूर पायीपीट करत गावाची वाट धरली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.