नवी दिल्ली। देशाने काल, गुरुवारी एक नवा विक्रम रचला. १०० कोटी लसीकरणाचा टप्पा देशात पार पाडला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार आणि कौतुक केले. तसेच देशाने इतिहास रचल्याचे मोदी म्हणाले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यलयाने दिली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार आणि कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन याविषयी माहिती देण्यात आली आहे. देशभरातील शंभर कोटी लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोदी जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
PM @narendramodi will address the nation at 10 AM today.
— PMO India (@PMOIndia) October 22, 2021
या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता
- नरेंद्र मोदी लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण लहान मुलांची जी लस आहे , त्या लसीची शिफारशी डीजीसीएला एक्सपर्ट कमेटीने केली आहे . त्यामुळे लहान मुलांच्या लसीला कधीही आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळू शकते.
- तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण अन्न योजनेसंदर्भात बोलू शकतात . त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत मोफत गरिबांना अन्न देण्याची योजनेत वाढ होऊ शकते.
- उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले . यामुळे उत्तराखंडमध्ये मोठे नुकसान झाले आहे . त्यामुळे उत्तराखंडसाठी पॅकेजची घोषणा होऊ शकते.
आणि यासारखे अनेक प्रकारे मुद्दे आहेत. काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांविरोधात कारवाया सुरू आहेत. गेल्या १२ दिवसांपासून काश्मीरमध्ये चकमक सुरू आहे. यामुळे सरकार सध्या चिंतेत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २३ ऑक्टोबर रोजी काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी लष्करप्रमुख एम. नरवणे यांनी जम्मू -काश्मीरला भेट दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.