नवी दिल्ली। भारताने अनेक अडचणीवर मात करत 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. आणि याच लसीकरणाच्या टप्प्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधायला सुरुवात केली. भारताने एक नवा इतिहास रचला. सामूहिक शक्ती आणि सबका साथ, सबका विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे. त्याचंच हे फळ आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशाने 100 कोटी व्हॅक्सिनेशनचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधत व्हॅक्सिनेशची निर्मिती, वितरण, लसीकरणासह नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर भाष्य केलं. त्यांनी भाषणाची सुरुवातच एका वेद वाक्याने केली. त्यानंतर त्यांनी व्हॅक्सिनेशन प्रोग्रामवर डिटेल्स माहिती दिली. आपल्या देशाने आपलं कर्तव्य पार पाडलं आणि त्यात यशही मिळवलं. आपल्या देशाने 100 कोटी डोसचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. 130 कोटी लोकांची शक्ती त्यामागे होती. हे यश देशाचं यश होतं. देशवासियांचं यश आहे. त्यासाठी सर्व देशावासियांचं मी अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले.
देशाने कर्तव्यही निभावलं आणि यश देखील मिळवले
100 कोटी लसीकरण हा एक केवळ आकडा नाही तर हा नवीन भारताचा चेहरा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधन करताना म्हणाले.देशाने कर्तव्यही निभावलं आणि यश देखील मिळवले. हे संपूर्ण देशाचे यश आहे. आणि या यशामागे 130 कोटी लोकांची मेहनत आहे. शंभर कोटी लसीकरण हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे.सुरुवातीला भारत कोरोनाशी लढू शकेल का? असे सवाल देखील उपस्थित केले जात होते. याबरोबरच भारतीयांना लस मिळेल की नाही अशी देखील शंका उपस्थित होत होती. आणि या सगळ्यावर आपण यश मिळवले म्हणून हे संपूर्ण भारताचा यश आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाचं कौतुक केले. तर कोणताही भेदभाव न करता लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा देखील बोलताना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
मेड इन इंडियाची ताकद मोठी आहे
सामुहिक शक्तीमुळे हा 100 कोटींचा टप्पा गाठता आला. म्हणूनच लसीकरणामुळे उत्साहाचं वातावरण आहे. आणि यात शंभर कोटी लसीकरणामुळे यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय.रोग भेदभाव करत नाही तर, लसही भेदभाव करणार नाही. मेड इन इंडियाची ताकद मोठी आहे.
म्हणून मेड इन इंडियाच्या ताकदीचा अनुभव आता देशाला येत असल्याचे प्रतिपादन देखिल त्यांनी केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.