HW News Marathi
Covid-19

“काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करुन धार्मिक तेढ निर्माण केली”

मुंबई | कोरोनाचा संसर्ग देशात आणि राज्यात अधिक जाला आहे. त्याचा परिणाम आर्थिक तिजोरीवरही झाला आहे. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने धार्मिक संस्तांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरुपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १-२ टक्के व्याज द्यावे अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या सूचनेचा चुकीचा अर्थ पसरवण्यात आला आहे.

काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करुन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला आहे असे, पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले की, मी केलेली सूचना ही चालू योजनेचाच एक भाग आहे. अशा प्रकारची योजना पहिल्यांदा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९८ च्या अणु चाचणीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर १९९९ साली Gold Deposit Scheme या नावाने सुरू केली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदर योजनेचे नाव बदलून Gold Monetization Scheme, २०१५ अशी नवी योजना सुरू केली आहे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

योजनेच्या पहिल्या वर्षातच देशभरातील ८ मंदिरांनी त्यांचे सोने विविध बँकांमध्ये ठेवले असे अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. यामध्ये शिर्डी तसेच तिरुपती या देवस्थानांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०१५ ते ३१ जानेवारी २०२० पर्यंत या योजने अंतर्गत ११ बँकांमध्ये २०.५ टन सोने जमा झाले आहे. आपल्या देशातील बरेचसे सोने हे व्यवहारात नाही, असे वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अहवाल सांगतो.

कोविडच्या अभूतपूर्व संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील सोन्याचे योग्य नियोजन आणि विनिमय करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मी ही सूचना केली होती. परंतु काही व्यक्तींनी आणि विशीष्ट माध्यमांनी याचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मी एका विशिष्ट धर्माला केंद्रबिंदू केले आहे असे भासविले. या संदर्भात मी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करेन, असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्याने ओलांडला ९० हजारांचा टप्पा

News Desk

“मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणारचं”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk

गेल्या २४ तासात सर्वाधिक ८,९०९ रुग्णांची नोंद, तर देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ओलांडला २ लाखांचा टप्पा

News Desk