HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकेन- प्रिया बेर्डे

पुणे | अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत आज (७ जुलै) प्रवेश केला. पुण्यात प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांचा पक्षप्रवेश झाला. महिला कलाकार, लोक कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करण्याचा मानस यावेळी प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केला. शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीची निवड केल्याचे मत त्यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना मांडले.

“आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे. राजकारणात प्रवेशासाठी राष्ट्रवादीची निवड का केली, असा प्रश्न मला विचारला जातो. तर शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादी काँग्रेसने ३ हजार लोक कलावंतांना प्रत्येकी ३०० रुपये मानधन दिले. नाट्य-चित्रपट क्षेत्रातही अनेक निर्माते दिग्दर्शक यांनी मदत केली आहे, तीही कोणताच गवगवा न करता.” असे प्रिया बेर्डे म्हणाल्या.

“मला आपल्या कलाकार तंत्रज्ञ यांच्याविषयी तळमळ वाटते. राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकेन. मी स्वतःला नेता म्हणणार नाही. कारण आम्ही सगळे जण एकत्र काम करणार आहोत. अभिनय सुरुच राहील, निर्माती म्हणूनही काम करत आहे, ते चालू ठेवेन” असं प्रिया बेर्डे यांनी सांगितले.

Related posts

#AyodhyaRamMandir : माझ्या हृदयाजवळचं एक स्वप्न पूर्ण होतंय !

News Desk

सोमय्यांनी कागदपत्रं दिल्यास उद्धव ठाकरेंची चौकशी होणार – मुख्यमंत्री

News Desk

महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे एकजुटीचे शक्तीप्रदर्शन

News Desk