HW News Marathi
देश / विदेश

शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई | शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सेनेत राज्यसभेसाठी चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांची नावे आघाडीवर होते. मात्र, सेनेने पक्षातील निष्ठावंत यांना डावलून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदीना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने पक्षातील नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीच्या चौथ्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. ही जागा कुठल्या पक्षाकडे जाते हे याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन ७ पैकी ३ जागांवर दावा केला आहे. उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी आपला राज्यसभेसाठीचा आज (१२ मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (११ मार्च) राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्याफौजिया खान उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत.

राज्यसभेसाठी भाजपकडून पक्ष्यातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे चर्चेत होते. मात्र, पक्षाने खडसेंना पुन्हा एकदा डावलण्यात आले. पक्षाने राठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अबू सालेमला सप्टेंबरमध्ये शिक्षा

News Desk

रॉबर्ट वाड्रा यांची उद्या पुन्हा चौकशी

News Desk

अखेर हार्दिक पटेल यांचे उपोषण मागे, सरकारकडून मात्र उपेक्षा

News Desk