HW Marathi
महाराष्ट्र

भर उन्हाळ्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मुंबई | एकीकडे मुंबईच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मुंबईसह आसपासच्या भागात हवामान अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शनिवारी मुंबईची आर्द्रता ९४ टक्के इतकी नोंदविण्यात आली असून मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशावर जाऊन पोहोचले आहे.

कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातील कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ७ ते १० एप्रिलदरम्यान विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहील. तर, मुंबईतही हवामान अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Related posts

रेल्वे अपघात रोखण्यासाठी घेणार जपानची मदत

News Desk

महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 2)

News Desk

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ?

News Desk