HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : आदित्य ठाकरेंची संपत्ती जाहीर

मुंबई | शिवसेनेचे युवा नेते आदित्य वरळी मतदार संघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वरळी मतदार संघातून शिवसेनेने वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे कुटुंबिय उपस्थित होते. आदित्य यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंनी एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती दाखविली आहे.

यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

उमदेवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर निघताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. अर्ज भरण्यासाठी घरातून निघताना आदित्य आजोबांच्या खोलीत गेले. त्या ठिकाणी असलेल्या बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. आदित्य यांनी हा फोटो ट्विटर हँडलेवर केला आहे. त्यामध्ये बाळासाहेबांनी वापरलेल्या विविध वस्तू दिसत आहेत. यामध्ये बाळासाहेबांचा बेड, त्यावर बाळासाहेबांची स्वाक्षरी असलेली उशी, त्यांचे उपरणे, काही पुस्तके, कागदपत्रे यांचा समावेश आहे.

आदित्य ठाकरेंची संपत्ती ११ काेटी ३८ लाखांवर

  • बँक ठेवी – १० काेटी ३६ लाख
  • बॉन्ड शेअर्स- २० लाख ३९ हजार
  • वाहन – बीएमडब्लू कार
  • एमएच -0९ सीबी – १२३४
  • किंमत – ६ लाख ५० हजार
  • दागिने- ६४ लाख ६५ हजार
  • इतर – १० लाख २२ हजार
  • एकूण – ११ काेटी ३८ लाख

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आत्महत्येपाठोपाठ कामगारांच्या आत्महत्यांचा प्रश्न आता ऐरणीवर!

News Desk

HW Exclusive : लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री आणि अध्यक्ष! – मुनगंटीवारांची सरकारवर टीका

Aprna

जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिली पोलिसांना क्लीन चिट

News Desk