HW News Marathi
महाराष्ट्र

उमरगा MIDC मधील जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची मालमत्ता EDकडून जप्त

उस्मानाबाद | उमरगा MIDC येथे खाजगी कंपनी असलेल्या जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रा.लिमिटेड कंपनीची 45 कोटी 50 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे. दि. ८ जुलै रोजी ईडीने ही कारवाई केली आहे. याबाबत ईडीने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

सदरील कंपनी कोल्हापूर येथील असून दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत होती. मात्र गेल्या 6 वर्षांपासून जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रा. लिमिटेड कंपनी बंद आहे. कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता पुत्र संचालक आहेत, मनी लाँड्रीन्ग कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनी कायद्यातर्गत जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 5 मार्च 2009 रोजी नोंदणी झाली आहे. त्यानुसार 15 कोटी या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहेत व पेड कॅपिटल 2 कोटी आहे.

या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून 31 मार्च 2021 पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स या अंतर्गत या कंपनीची नोंदणी असून दारू निर्मिती हा या कंपनीचा उद्देश आहे. ही कंपनी दारू निर्मितीच्या क्षेत्रात काम करीत असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. तर कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता दिसुन येत आहे, सदरील कंपनी सद्या बंद आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वगृही आणण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

कोरोनाची जोखीम कमी करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक! – छगन भुजबळ

Aprna

मराठा क्रांती मोर्चा विरोधातली याचिका मागे, समन्वयकांनी घेतली तोडफोडीची दखल

swarit