HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार 

बारामती | मराठा आरक्षण प्रश्न दिवसेंदिवस अति महत्वाचा होत चालला आहे. या प्रश्नावर आता मराठी क्रांती मोर्चाचे सदस्य अधिक आक्रमक झाले आहेत. बारामतीत शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी ९ ते ११ या वेळेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केली गेली. दरम्यान, राज्य सरकारने न्यायालयात स्थगिती मागे घ्यावी यासाठी विनंती अर्ज केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानासमोर शनिवारी बारामती शहर व बारामती तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांकडून ढोल वाजवून आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन करताना पोलिस प्रशासनाचे नियम, कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा तसेच वेळोवेळी सॅनेटायझरचा वापर करणे या बाबी पाळणे बंधनकारक असणार आहे. मराठा समाजावर अन्याय होतो आहे, तरीही आपण कायदा व सुव्यवस्था त्याचसोबत स्वताःची व सामाजिक स्वास्थ्याची जबाबदारी घेत हे आंदोलन करायचे असल्याचे या बाबतच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या! – मुख्यमंत्री

Aprna

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत केली – देवेंद्र फडणवीस

News Desk

परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला, अनिल देशमुखांचे ट्विट

News Desk