HW News Marathi
महाराष्ट्र

१ आणि २ डिसेंबर महाराष्ट्रभरात महावितरण कार्यालयासमोर निदर्शने व ८ डिसेंबरला मुंबईवर मराठ्यांचा वाहनमार्च 

मुंबई | आज मराठा क्रांती मोर्चा राज्यस्तरीय निर्णायक बैठक, पुणे येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थी व नोकरी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रक्रिया सुरु केल्या प्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे.

महावितरणमध्ये उमेदवारांना डावलून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरण ने घेतल्याने मराठा समाज येत्या १ व २ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्या नुसार अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात करणार आहे.

त्याचप्रमाणे येत्या ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.

२०१४ ते २०२० प्रलंबित शासकीय नियुक्ती उमेदवार प्रश्र्न, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुपर न्युमररी , अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे , असे अनेक प्रश्न शासनाने सोडविले नसल्याने मराठा तरुण आक्रमक आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पॅकेजवर माझा विश्वास नाही जे गरजेचं आहे ते करणार,” उद्धव ठाकरेंचं कोकणवासीयांना आश्वासन

News Desk

राज्यातील पुरग्रस्तांना अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपये रोख

News Desk

बारवी धरणप्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे आदेश महापालिकांना एप्रिल अखेरची मुदत

News Desk