मुंबई। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थीांना आणि सामान्य नागरिक मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात आझाद मैदानात स्थलांतरित करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी निषेध सुरूच राहिल असे आंदोलनकर्त्यांनी सांगितेल.
Kapil Agarwal,protester: We were forcibly shifted here to Azad Maidan by Police. But now we have called off our 'occupy Gateway of India' protests, it was a successful protest. Our resistance will continue, we have a long line up of programs. #Mumbai pic.twitter.com/5jiYaLflDI
— ANI (@ANI) January 7, 2020
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी)रात्री मास्कधारी हल्लेखोरांनी हैदोस घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या वसतीगृहात हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया काल (६ जानेवारी) दिवसभर आंदोलन करत होते. मात्र, गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्याची परवानगी नसल्याचे मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदाना हलविण्यात आले आहे.
जेएनयूमध्ये नेमके काय घडले
दिल्लीतील जेएनयूच्या वसतीगृहात रविवारी (६ जानेवारी) अज्ञात इसमांनी मुलीच्या वसतीगृहात हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला चढविला. या हल्लायत जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष यांच्यावर हल्ला झाला. या हल्लायत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अज्ञात हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. मास्क घालून हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक आणि काठ्या त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.