HW Marathi
Covid-19 पुणे महाराष्ट्र राजकारण

यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही !

पुणे | “यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही”, असे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (१४ ऑगस्ट) सप्ष्टपणे सांगितले आहे. राज्यातील कोरोनास्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. राज्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनामुळे यंदा सगळेच सणवार हे अत्यंत सध्या पद्धतीने आणि थोडक्यात साजरे करण्यात आले आहेत. त्यातच गणेशोत्सवही काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अजित पवार यांनी हे स्पष्ट विधान केले आहे.

“कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. यंदा आपण आषाढी वारी, दहीहंडी हे उत्सव साधेपणाने साजरे केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने अधिवेशनसुद्धा रद्द केले. त्यामुळे गणेशोत्सव देखील साधेपणानेच साजरा करा. त्याचप्रमाणे, गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यात यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही”, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात झालेल्या कोरोना निर्मूलन आढावा बैठक झाली.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आतापर्यंत केले तसेच सहकार्य करा. यंदा गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही”, असे अजित पवार पुण्यातील बैठकीत म्हणाले. पुढे अजित पवार म्हणले कि, “पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची घट होण्याचे प्रमाण वाढते आहे. ही एक खूप सकारात्मक आणि समाधानकारक बाब आहे. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे, आपण सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, एकीकडे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना दुसरीकडे कोरोनाबाधितांना वेळेवर उपचार मिळणे देखील महत्वाचे आहे”, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Related posts

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे ‘कोरोना निगेटिव्ह’

rasika shinde

आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करावेत !

News Desk

पीक विमा भरण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ द्या-अशोक चव्हाण

News Desk