HW News Marathi
महाराष्ट्र

दानवेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहणार | चंद्रकांत पाटील

मुंबई | पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे पाटील यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. यानंतर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु सध्या दानवेच प्रदेशाध्यक्ष पदी राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगून या सर्व चर्चेंना पूर्णविराम लावला आहे.

प्रदेशाध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून केंद्रीय अध्यक्षद्वारे प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटील यांनी मुलाखतीदरम्यान दिली. सध्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचार सुरू असून मंत्रिमंडळाबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असे देखील पाटील म्हणाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतचा फॉर्म्युला बदलणार नसल्याची माहिती देखील पाटील यांनी मुलाखतीत दिली. तसेच भाजपचा झेंडा पश्चिम महाराष्ट्रात देखील फडकणार यावर विश्वास होता. परंतु बारामतीचा अंदाज मात्र, चुकीचा ठरल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

संजय राऊत यांची आज पत्रकार परिषदेत काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी भेट बोनस

swarit