HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध !

मुंबई | मेट्रो कारशेडच्या विरोध केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अटक करण्यात आली आहे. आंबेडकर आज (६ ऑक्टोबर) आरे कॉलनीत वृक्षतोडीचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्यासाठी गेले होते. आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना वाऱ्यासारखी परसरल्यानंतर बारामतीतील वंचितचे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत एसटी बसवर दगडफेक केली. त्याचबरोबर सरकार विरोधात निषेध केली गेली.

मेट्रो कारशेडच्या मुंबईच्या आरेमधील जंगलातील झाडांच्या कत्तलवरून राज्यभरात सरकारविरोधात होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंबेडकरांना अटक झाल्याचे समजताच बारामती येथील गुणवडी चौकात बारामती-दौंड शटल बस (क्रमांक एमएच १२, इएफ ६३६०) ही बस आली असता. तोंडाला रूमाल बांधलेल्या चार ते पाच तरूणांनी हात करून बस थांबवली. चालकाने बस थांबवल्यानंतर यातील एका तरूणाने बसवर ‘बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध’ असा मजकुर असलेला कागद चिटकवला. त्यानंतर काही कळण्याच्या आतच बसच्या समोरील काचेवर दगडफेक केली.

तसेच दरम्यान पाेलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेऊन पवई पाेलीस स्टेशनला नेले आहे. याबाबत आंबेडकरांनी साेशल मीडियावर पाेस्ट लिहीत माहिती दिली आहे. ‘पोलिसांनी मला ताब्यात घेतले आहे.मला अटक केलेली नाही. पोलिसांसोबत मी पवई पोलिस स्टेशनमध्ये आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. कायदा सुव्य़वस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी’ असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पाेस्ट करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किटकांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार करण्याचा निर्णय! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

राज्याचे हित साधले जात असेल तर इतरांचेही अनुकरण करू!

News Desk

INS विक्रांत प्रकरणी नील सोमय्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Aprna