मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई लाईफ लाईन मानली जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून बुहतांश नागरिक प्रवास करतात. यामुळे कोरोनाचा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रदुर्भाव वाढू नये, यासाठी मुंबईतील प्लॅटफॉर्मवर मोठ्याप्रमाणात गर्दी होते. गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने आज (१७ मार्च) रेल्वेच्या २५० प्लॅटफॉर्मच्या तिकीटात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म १० रुपयवरून ५० रुपये केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Indian Railway Official: Platform ticket price has been increased to Rs. 50 at about 250 stations in 6 Divisions-Mumbai, Vadodara, Ahmedabad, Ratlam, Rajkot, Bhavnagar, till further orders, to ensure crowd control. #Coronavirus pic.twitter.com/Osg3Qw8axd
— ANI (@ANI) March 17, 2020
दरम्यान, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर राज्या सध्या कोरोना ग्रस्तांची संख्या ३९ वरून ३८ वर आली आहे. तर देशात १२८ कोरोना रुग्णांची संख्या आहे. राज्याची परिस्थिती संवेदनशील असून राज्यात शटडाऊनची गरज असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील २० ते २५ कॉर्पोरेट कंपन्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी सहकार्य करण्यास तयार असून वर्क फ्रॉम होम करण्यास सहकार्य केले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री आज (१७ मार्च) पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.
Public Relations Officer (PRO), Central Railway: Central Railway has increased platform ticket price from Rs. 10 to Rs. 50 on its Mumbai, Pune, Bhusawal and Solapur Divisions, till further orders, in order to curb crowd at these stations. #COVID19 pic.twitter.com/sVrghyMSij
— ANI (@ANI) March 17, 2020
तसेच सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठक बोलविली आहे. सध्या ही कॅबिनेट बैठक सुरू असून या बैठकीनंतर मुंबईतील लोकल ट्रेन आणि बस सेवा आठवड्याभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.