नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत. शहीद संजय राजपूत आणि शहीद नितीन राठोड यांचे पार्थिव आज(१६ फेब्रुवारी) सकाळी औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले होते. यानंतर बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांना त्यांच्या मूळ मलकापूर संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Maharashtra: Visuals from Chorpangra, Baldana as mortal remains of CRPF Constable Nitin Shivaji Rathod are being brought for last rites. #PulwamaAttack pic.twitter.com/2ZwkNznfqi
— ANI (@ANI) February 16, 2019
मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन सीआरपीएफ जवान पुलवामा येथील दहशतवादी ह्ल्ल्यात शहीद झाले. हे दोघेही १० फेब्रुवारीला सुट्टी संपल्यानंतर ड्यूटीवर रूजू झाले होते. या दोन्ही शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित नागरिकांनी ‘अमर रहे, शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
या दोन्ही जवानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी उपस्थित होते. दोन्ही जवानांच्या पार्थिवावर चोरपांगरा आणि मलकापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबादारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.