HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे बंद, ८ जणांना वाचवण्यात यश

पुणे | गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मध्यरात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे.

दरम्यान मध्यरात्री कोल्हापूर येथून बेळगावकडे जाणारी कार व ट्रक पाण्यातच अडकून पडले. यावेळी रस्ते देखभाल जयहिंद कंपनीसह पोलिस प्रशासनाने मोठ्या शर्यतीच्या प्रयत्नाने कारमधील ५ व ट्रक मधील ३ अशा ८ जणांना सुखरूप बाहेर काढले. असून दोन्ही वाहने पाण्याचा अडकून पडले आहेत.

दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून तहसील प्रशासनाने चिकोडी येथे राखीव असलेल्या एनडीआरएफ तुकडीला पाचारण केले. सकाळी दहानंतर प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा तसेच रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. दरम्यान सौंदलगा व यमगरणी वेदगंगा नदी पुलावर दोन्ही बाजूला स्थानिक ग्रामपंचायतीच्या तहसील पोलिस तसेच जिल्हा पातळीवरील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तळ ठोकून आहेत.

दोन्ही बाजूला पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स व आदी साहित्य लावून नागरिकास वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

एनडीआरएफ पथक येऊन पाहणी केल्याशिवाय कोणत्याही नागरिकांना व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसामुळे 2019 साला ची पुनरावृत्ती होऊन पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी होऊन महामार्ग बंद पडला आहे. दोन दिवसात परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.. अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे.

वाहतुकीचे कसे केले नियोजन?

राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक कोगनोळी सीमा तपासणी नाका येथून तर बेळगावहून कोल्हापूर व पुणे मुंबईकडे होणारी वाहतूक महामार्गावरील तवंदी घाट येथील शिपूर फाटा येथून मागे वळविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य! – मुख्यमंत्री

Aprna

MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषद घेणार – विजय वडेट्टीवार

News Desk

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मराठवाड्यासाठी आणखी एक दिलासादायक निर्णय !..

News Desk