HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीला आग, सर्व रासायनिक साठ जळून खाक

पुणे | पुण्यात कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सीलेट या कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. काल (३० सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास अचानक या कंपनीत आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीत आग लागल्याने मोठ्याने स्फोटाचे आवाज येत होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेचा अहवाल मागितला आहे.
आग आणि स्फोटाची तीव्रता भयानक होती. साधारण १५ ते २० किलोमीटर अंतरावरून आग आणि धुराचे लोट दिसून आले होते. कंपनी गावापासून जवळच असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी गाव सोडून पळण्याची भूमिका घेतली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव इतर आजूबाजूच्या कंपन्यातील कामगारांना बाहेर सोडण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीत प्रचंड प्रमाणात असलेला रासायनिक (केमिकल) साठा जळून खाक झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला गळती, मुलाखतीला ‘या’ आमदारांनी पाठ फिरवली

News Desk

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Manasi Devkar

दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणावे, रोहित पवारांची पंतप्रधानांना विनंती

News Desk