पुणे | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३००० च्या घरात आहे. पुण्यात आज दिवसभरात ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात नायडू रुग्णालयात १७, ससून, ९, रुबी ८, दीनानाथ ४, केईएम आणि नोबेल रुग्णालयात प्रत्येकी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच, सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ५४४ वर गेल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
पुण्यात दिवसभरात नवे ४३ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज दिवसभरात नव्या ४३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. नायडू १७, ससून ९, रुबी ८, दीनानाथ ४, केईएम आणि नोबेल प्रत्येकी २ तर सह्याद्री १ असा नव्या रुग्णांचा तपशील आहे.
पुणे शहर कोरोनाबाधित रुग्णसंख्या : ५४४
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 18, 2020
तसेच, एक आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आणखी ३ जणांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. य सर्व रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचे महापौरांनी ट्विटरवरुन आभिनंदन केले आहे. त्यामुळे आता पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ३७ झाली आहे.
पुण्यात आणखी ४ रुग्ण कोरोनामुक्त !
पुणे शहरात आज आणखी ४ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. ३ रुग्णांवर @PMCPune च्या डॉ. नायडू रुग्णालयात तर एका रुग्णावर 'जहांगीर'मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन !
पुणे शहर कोरोनामुक्त : ३७
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.