HW News Marathi
महाराष्ट्र

डबल मास्क आणि फेस शिल्ड लावण्याचे पोलिसांना हेमंत नगराळेंचे आदेश

मुंबई | मुंबईतील तसेच राज्यातील कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, आता डबल मास्क लावण्याची वेळ आली आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेने दिल्यानंतर, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांना फेस शिल्ड आणि डबल मास्क घालण्याचे आदेश, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. सामान्य नागरिकांसोबत अनेक पोलिसांचाही कोरोनामुळे जीव गेला आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतत बंदोबस्त करावा लागत आहे. मुंबई पोलीस सतत रस्त्यावर,लोकांमध्ये वावरत असतात. याचा परिणाम पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. आतापर्यंत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्याही मोठी आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्वाचे आदेश काढले आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी फेस शिल्ड घालावी. त्याचमाणे डबल मास्क घालावेत असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या आधी गाड्यांवर कलर कोड प्रमाणे स्टिकर लावण्याचे आदेशही हेमंत नगराळे यांनी दिले होते. मात्र,काहीच दिवसांत ते आदेश हटवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दत्ता पडसलगीकर यांच्या सेवा मुदतवाढीविरोधात रिट याचिका दाखल

News Desk

“शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत”, राऊतांचा निशाणा

News Desk

आर्यन खान ‘रिलिज’! आर्थर रोड जेलमधून २७ दिवसानंतर सुटका

News Desk