HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी!धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक ‘पोस्ट’ ! सोबत या नेत्यांचीही बदनामी

पुणे। पुणे सायबर क्राईम विभागाने मंत्री धनंजय मुंडे आणि करून शर्मा यांच्या नावाचा संदर्भ घेऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक पोस्ट टाकल्याबद्दल बदनामी कारण्यारांविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राहुल मुळे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बदनामीकारक पोस्ट फेसबुक वर टाकण्या साठी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

ज्ञानेश्वर बडे यांनी हि फिर्याद दिली आहे. फेसबुकवर हा प्रकार ११ एप्रिल २०२१ पासून सुरु होता, राहुल मुळे या इसमाने त्याच्या खात्यावरून वेगवेगळ्या अश्लिल व घाणेरड्या भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच त्याच्या काही पोस्टला रिप्लाय देणाऱ्या लोकांना प्राण्यांच्या पार्श्वभागाचे फोटो टाकून अश्लिल व घाणेरड्या भरेषेमध्ये रिप्लाय द्यायचा. त्याच्या काही पोस्टमध्ये मराठा समाजामध्ये दुष्टता द्वेषाची भावना निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट टाकून भाष्य करून पोस्ट केली आहे.

कोणत्या नेत्यांविरुद्ध फेसबुक पोस्ट?

राज्यातील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि करून शर्मा यांचा संदर्भ घेऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप आमदार प्रवीण दरेकर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, रोहित पवार, अमोल मिटकरी, यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोरे या संदर्भात अधिक तपस करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवार १८ वर्षाचा आहे, आणि परिपक्व आहे… नारायण राणेंनी केली पाठराखण !

swarit

परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला, अनिल देशमुखांचे ट्विट

News Desk

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या जबादारीतून भाजपने अंग काढून घेऊ नये | ठाकरे

swarit