HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई | पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक पक्ष आल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. भाजपकडून ४ उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली

अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. नागपुरातून अभिजित वंजारी (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून मनसेकडून रुपाली ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमची सत्ता असताना आता इंधन दरवाढीवरून ट्विट करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

News Desk

नारायण राणेंचा कोकणात डंका,’या’ निवडणुकीत महाविकासआघाडीला दिला धक्का!

News Desk

संजय मंडलीक गटाला धक्का ! विरेंद्र मंडलीक यांचा पराभव

News Desk