HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीने खडसेंना समज द्यावी, नाहीतर…! ‘त्या’ वक्तव्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठे वक्तव्य केले आहे. खडसे यांनी असे म्हटले की, मी एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री पद दान केले. खडसे यांच्या या वक्तव्यानंतर ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एच. डब्ल्यु मराठीशी बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी असे सांगितले की एकनाथ खडसे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे नाहीतर पदवीधर निवडणुकीमध्ये ब्राम्हण समाज मतदान करणार नाही.

पुढे दवे असेही काल (८ नोव्हेंबर) एकनाथ खडसे यांच्याशी बातचीत झाली त्यावेळी ते असे म्हणाले की माझा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. जर असं होतं तर त्यांनी फडणवीसांना दान केलं असे म्हणायला हवे होते. त्यात त्यांनी ब्राह्मणांचा उल्लेख करायला नको होता. जर राष्ट्रवादीने खडसेंना समज दिली नाही आणि त्यांनी त्यांनी शब्द मागे घेतले नाही तर पदवीधर निवडणूकीत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

#EknathKhadse #DevendraFadnavis #SharadPawar #NCP #BJP #BrahmanMahasangh #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता ! पंकजांचं काय ?

News Desk

Elections2019 | आम्ही मत देऊ शकत नाही पण….

swarit

Rashmi Thackeray यांना मुंबई महानगरपालिकेचे खोके मातोश्रीवर येणं बंद झाले Deepali Sayyed यांचा आरोप

News Desk