HW News Marathi
Covid-19

पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात महापौरांनी दिली माहिती!

पुणे | यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन सरकारने देखील केले आहे. पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, या वर्षी कसा साजरा करावा याबाबत महत्वाची बैठक पार पडली. नियमावली काय असणार याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करण्यात आली असून याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पोलिस आणि पुणे प्रशासन यांच्यात ही बैठक पार पडली. यात एकूणच कोरोनाचा विचार करता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, मिरवणुका काढू नयेत, आपल्याच मांडवामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले. तसेच, या सर्व मंडळांना सामाजिक भान आहे असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

https://www.facebook.com/1380455935513531/posts/3292621554296950/?sfnsn=wiwspwa&extid=IzEi95UpHDNCaLft&d=w&vh=e

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दादा लढवय्ये आहेत”, अजित दादांना कोरोना झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट!

News Desk

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, कोरोनामुक्तांचे आकडे वाढले

News Desk

राज्यात आजही नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांहून अधिक

News Desk